गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका?

Oct 2 2017 8:14PM
अहमदाबाद ः गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली. पोरबंदर येथे आयोजित सेभत शहा यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या केवळ शरसंधानच साधलेे असे नव्हे तर राज्यात विधासभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होतील, असेही म्हटले आहे. विशेष म्हणजे, गुजरात विधासभेचा कार्यकाळ 22 जानेवारी 2018 रोजी संपणार आहे. अमित शहा यांनी सरकार पटेल आणि माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यावर कॉंग्रेसने अन्याय केल्याचा गंभीर आरोप करत, त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल असे सांगितले.