लास वेगासमधील गोळीबारात 50 ठार

Oct 2 2017 8:37PM
लास वेगास : अमेरिकेतील लास वेगास येथे एका संगीत कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात 50 जण ठार झाले असून, 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा हल्ला वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला दहशतवादी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच, हल्लेखोरांची नेमकी संख्याही स्पष्ट झालेली नाही. मात्र, 32 व्या मजल्यावरून दोन ते तीन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. एका हल्लेखोराला टिपण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, तो स्थानिकच असल्याचे सांगितले जाते.