हनीप्रीत अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Oct 3 2017 6:34PM
चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची कथित कन्या हनीप्रीत अखेर पोलिसांच्या जाळ्यात आली. गेल्या 38 दिवसांपासून फरारी असलेल्या हनीप्रीतला हरयाना पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी अटक केली. हनीप्रीतला पटियाला येथील एका महामार्गावरून अटक करण्यात आली. तिच्या सोबत अन्य एक महिला होती. हरयाना पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याची ओळख जाहीर केलेली नाही. हनीप्रीतला आज (बुधवारी) पंचकुला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.