वडिल अथवा रक्ताच्या नात्याच्या आधारावर जातप्रमापणत्र मिळणार

Oct 3 2017 7:28PM
मुंबई, (प्रतिनिधी) : वडिलांच्या अथवा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मिळालेल्या जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे मुलाला अथवा मुलीला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.