पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Oct 4 2017 6:40PM
श्रीनगर : पाकिस्तानकडून सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या पुंछ भागात काल सकाळी नऊच्या सुमारास पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारास भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबारात तीन जवानांसह पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.