पतधोरण जाहीर; व्याज दर "जैसे थे'

Oct 4 2017 7:33PM
नवी दिल्ली : रिझर्व बॅंकेने चालू आर्थिक वर्षातील चाथे द्विमासिक पतधोरण बुधवारी जाहीर केले. रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व बॅंकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत. गेल्या द्विमासिक पतधोरणात रिझर्व बॅंकेच्या पतरोधण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती. मात्र, यंदाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती.