रजनीश कुमार स्टेट बॅंकेचे नवे अध्यक्ष

Oct 4 2017 7:34PM
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात माठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे रजनीश कुमार हे नवे अध्यक्ष असतील. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. रजनीश कुमार सध्या एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते अरुंधती भट्टाचार्या यांची जागा घेतील. भट्टाचार्य याच आठवड्यात निवृत्त होत आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होत्या. भट्टाचार्य यांना 2016 मध्ये वर्षभरासाठी कार्यकाळ वाढवून देण्यात आला होता. स्टेट बॅंकेचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या भट्टाचार्य ह्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.