भाजप नगरसेवकाला झाडाला बांधून चोपले

Oct 4 2017 8:20PM
वडोदरा : गुजरातमध्ये भाजप नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडोदरा शहरातील बोपड येथे ही घटना घडली. झोपडपट्‌ट्यांवर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी सत्तेत असणाऱ्या भाजप नगरसेवक हसमुख पटेल यांना झाडाला बांधून मारहाण करत आपला संताप व्यक्त केला. हसमुख पटेल यांना झाडला बांधल्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत पटेल यांचा शर्ट फाटलेला दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 70 जणांना अटक केली आहे.