भाजप खासदाराचे बेताल वक्तव्य

Oct 4 2017 8:21PM
रायपूर : आता मुंबई आणि कोलकात्ताच्या मुलींची आवश्यकता नाही. छत्तीसगडच्या मुली दिवसें दिवस टनाटन होत आहेत, असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार बन्सीलाल महतो यांनी केले आहे. महतो यांच्या विधानाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर, महतो यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. महतो हे छत्तीसगडमधील कोरबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. एका कार्यक्रमादरम्यान, महतो यांनी हे वादग्रस्त विधान केले. त्या कार्यक्रमाला माजी मुख्य मंत्री अजित जोगी यांची पुत्र आणि मरवाही मतदारसंघाचे आमदार अमित जोगी हेही उपस्थित होते. महतो यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, महतो यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल स्पष्टीकरण देताना आपण महिलांचा सन्मान करत असल्याचे म्हटले अआण विरोधकांकडून उगाच वातावरण तापवले जात असल्याचेही ते म्हणाले.