भाजप खासदाराचे बेताल वक्तव्य

Oct 4 2017 8:21PM
रायपूर : आता मुंबई आणि कोलकात्ताच्या मुलींची आवश्यकता नाही. छत्तीसगडच्या मुली दिवसें दिवस टनाटन होत आहेत, असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार बन्सीलाल महतो यांनी केले आहे. महतो यांच्या विधानाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर, महतो यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.