राधे मॉं थेट पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर

Oct 5 2017 5:35PM
नवी दिल्ली : वादग्रस्त राधे मॉं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवी दिल्लीतील विहारमधील पोलिस ठाण्यात राधे मॉं चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर विराजमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, राधे मॉंसमोर पोलिस अधिकारी हात जोडून उभा होता. इतकेच नव्हे तर, राधे मॉंने दिलेली लाल चुनरी त्याने गळ्यात गुंडाळली होती.