गुजरात दंगल : मोदींविरोधातील अर्ज फेटाळला

Oct 5 2017 6:00PM
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलप्रकरणी दिलासा मिळाला आहे. 2002च्या गुजरात दंगलप्रकरणातील मोदींविरोधातील अर्ज गुरूवारी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तत्कालीन, मुख्यमंत्री मोदी यांच्यासमवेत अन्य 59 जणांची नव्याने चौकशी व्हावी, अशा मागणीचा अर्ज झाकिया जाफरी आजण सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी उच्च न्यायालयाकडे केला होता.