अखिलेश यांची सपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Oct 5 2017 6:25PM
आग्रा : समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखिलेश यादव यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यात आली. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. अखिलेश यांनी मुलायमसिंहांना अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले होते, ते अधिवेशनाला येणार असे सांगितले जात होते. मात्र, अधिवेशनाकडे मुलायम सिंह फिरकले नाहीत. अखिलेश यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. =