हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; सात जवानांचा मृत्यू

Oct 6 2017 5:14PM
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग परिसरात शुक्रवारी भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हवाई दलाच्या दोन अधिकाऱ्यांसह सात जवानांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. काल सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.