शशिकला यांना पाच दिवसांचा पॅरोल

Oct 6 2017 5:43PM
बंगळुरू : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरूंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही.के. शशिकला यांना शुक्रवारी पाच दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांनी गुरूवारी पंधरा दिवसांचा पॅरोल मागितला होता. अर्जासोबत त्यांनी पतीची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली होती. त्याआधीही, 3 ऑक्टोबरला शशिकला यांनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, अपुऱ्या कागदपत्रांचा हवाला देत फेटाळून लावण्यात आला होता.