शांततेचे नोबेल आयकॅन संस्थेला

Oct 6 2017 5:51PM
स्टॉकहोम : यंदाचे शांततेचे नोबेल आयकॅन (इंटरनॅशनल कॅम्पेन टू ऍबोलिश न्यूक्लियर वेपन्स) संस्थेला जाहीर झाले. आयकॅन संस्था जगातील 100 देशांमध्ये कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अण्वस्त्रांचा वापर सर्व देशांनी बंद करावा, यासाठी ही संघटना काम करते. शांततेच्या नोबेलसाठी 215 व्यक्तिगत तर 103 संस्थांचे अर्ज आले होते. ऑयकॅनच्या नावाला समितीच्या 300 हून अधिक सदस्यांनी पसंती दर्शवली.