नोटाबंदीनंतर 5800 कंपन्यांचे संशयास्पद व्यवहार उघड

Oct 6 2017 6:17PM
नवी दिल्ली : काळा पैसा आणि बनावट कंपन्यांविरोधात मोदी सरकारने सुरू केलेल्या कारवाईत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर संशयास्पद व्यवहारांबद्दल 13 बॅंकांनी सरकारला माहिती दिली. त्यात 5800 कंपन्यांचे संशयास्पद व्यवहार आढळले असून, त्यांच्या 13,140 बॅंक खात्यांची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली आहे. या कंपन्यांच्या खात्यावर नोटाबंदीच्या काळात अचानक 4,574 कोटी जमा करण्यात आले. तर,4,552 कोटी खात्यातून काढण्यात आले.