मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार सक्ती

Oct 10 2017 3:36PM
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी आधार सक्तीचे करण्यात आले आहे. पटना विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त शनिवारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित रहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचना केली असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉली सिन्हा यांनी सांगितले.