उत्तर प्रदेशात साखर कारखान्यात गॅस गळती; 300 विद्यार्थ्यांना बाधा

Oct 10 2017 4:13PM
लखनौ : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात साखर कारखान्यातील केमिकल गॅस गळतीमुळे सुमारे 300 विद्यार्थ्यांना बाधा झाली आहे. डोळ्यांची जळजळ, पोटदुखीचा त्रास झाल्याने विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 30 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.