नवी मुंबईत भुयार खोदून बॅंक लुटली

Nov 13 2017 6:51PM
मुंबई : नवी मुंबई येथील जुईनगरमधील सेक्टर 11 मध्ये बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेवर भुयार खोदून दरोडा टाकल्यात आल्याची घटना घडली आहे. बॅंक ऑफ बडोदातील ग्राहकांच्या 237 लॉकरपैकी 27 लॉकर्सवर चोरट्यांनी हात साफ केला. या सर्व लॉकरमध्ये सोन्याचे दागिने होते. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकलेली नाही. अत्यंत शिताफीने बाजूला असलेल्या खाद्य पदार्थाच्या दुकानातून चोरट्यांनी भुयारी मार्ग बनवला व बॅंकेवर दरोडा घातला.