काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना 90 टक्के कमी

Nov 13 2017 7:13PM
काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना 90 टक्के कमी जम्मू : जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना 90 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, असा दावा राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अशा घटनांमध्ये मोठी घट झाली असून याचे सर्व श्रेय काश्मीरमधील जनतेला जाते, असेही ते म्हणाले.