जीएसटीच्या 5 आणि 12 टक्के टप्प्यातही बदल होणार?

Nov 13 2017 7:23PM
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करांतर्गत 38 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये गेल्याच आठवड्यात मोठे बदल करण्यात आले. यानंतर आता कमी कर असलेल्या टप्प्यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीएसटीच्या अंतर्गत दोन ते तीन टप्पे येऊ शकतात, असे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिले आहे. गेल्या आठवड्यातच जनरेट्यामुळे जीएसटी परिषदेत 200 हून अधिक वस्तूंचा जीएसटी घटवण्याचा निर्णय मोदी सरकारला घेणे भाग पडले. यानंतर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीत पाच टप्पे नको तर करआकारणीसाठी एकच टप्पा हवा आहे, असे म्हटले होते. तसेच, पुढची लढाई समान कराची असेल, असेही राहुल म्हणाले होते.