इराण-इराक सीमेवर शक्तिशाली भूकंप 300 ठार, 2500 हून अधिक जखमी

Nov 13 2017 7:42PM
सुलेमानिया : इराण-इराक सीमेवर रविवारी रात्री एकच्या सुमारास जबरदस्त भूकंप आला. यात 300 जणांचा बळी गेला तर अडीच हजारहून अधिक जखमी आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी नोंदली गेली. अनेक ठिकाणी इमारती आणि घरे जमीनदोस्त झाल्याने ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमींवर विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबतच, जखमींना बाहेर काढण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहेत.