रस्त्यावर खड्डेच पडलेत, आभाळ कोसळले नाही : चंद्रकांत पाटील

Nov 14 2017 7:09PM
परभणी राज्यातील सर्व रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणारे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांच्या स्थितीवरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळले नाही, असे चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्‌ड्यांचे खापर आधीच्या सरकारांवर फोडत त्यांनी आपल्या सरकारचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. पाऊस पडला की खड्डे पडतात. त्यातच आधीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे जास्त काळ टिकतील असे रस्ते बनले नाहीत. रस्त्यांवरील खड्डे हे जुनेच आहेत. आता नव्याने खड्डे पडलेले नाहीत, असे अजब तर्कट त्यांनी मांडले.