शशिकला कुटुंबीयांची 1400 कोटींची संपत्ती उजेडात

Nov 14 2017 7:33PM
चेन्नई : ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या (एआयएडीएमके) नेत्या व्हीके शशिकला यांच्या कुटुंबीयांच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. शशिकला आणि त्यांच्याशी संबंधित विविध 187 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे टाकलेल्या छाप्यात 1430 कोटींची अघोषित संपत्ती आढळली आहे. ज्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला ते सर्व शशिकला यांचे नातेवाईक, निकटवर्तीय तसेच व्यावसायीक भागीदार होते. गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूसह दिल्ली, पॉंडेचरी आणि कर्नाटकात एकाच वेळी प्राप्तिकर विभागाने छापा घातला होता. यामध्ये प्राप्तिकर विभागाला छाप्यात 1430 कोटींची अघोषित संपत्ती आढळली आहे. या लोकांनी ही संपत्ती कशा प्रकारे कमावली, याचा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना थांगपत्ता लावला आहे. या 10 करदात्यांची चौकशी केली असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व जण अण्णाद्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या कुटुंब व मित्र परिवारातील आहेत. करचोरीच्या प्रकरणात शशिकलांचा भाचा टीटीव्ही दीनाकरण यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. चेन्नईतल्या जया टीव्हीच्या कार्यालयावर छापेमारीत सात कोटींहून अधिकची रोकड व पाच कोटी किमतीचे दागिने जप्त करण्यात आल्याचीही माहिती चेन्नईच्या एका वरिष्ठ प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित कागदपत्र व 1430 कोटींच्या अघोषित संपत्तीचा थांगपत्ता चौकशीअंती लावण्यात आला आहे. यातील सर्वाधिक संपत्ती ही तामिळनाडूमध्ये आहे.