वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्यावर हल्ला

Dec 4 2017 5:34PM
पुरी : वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने रविवारी सायंकाळी हल्ला केला. पटनायक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिशामधील पुरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवात पटनायक सहभागी झाले होते. परवा सायंकाळी गर्दीतून एक तरूण हस्तांदोलनासाठी पटनायक यांच्याजवळ आला. त्याने हस्तांदोलन केल्यावर पटनायक यांच्या मनगटावरील घड्याळ खेचण्याचा प्रयत्न केला. पटनायक यांनी विरोध दर्शवताच त्या तरूणाने पटनायक यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्या हल्लेखोराने गर्दीचा फायदा घेत तिथून पळ काढला. आज (मंगळवार) महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या महोत्सवात 70 वाळूशिल्पकार सहभागी झाले असून यात 18 महिलांचा समावेश आहे. जर्मनी, मेक्सिको, घाना, मेक्सिको, घाना, सिंगापूर, कॅनडा, स्पेन, श्रीलंका, रशिया या देशातील शिल्पकार सहभागी झाले आहेत.