शशी कपूर यांचे निधन

Dec 4 2017 6:07PM
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात करण कपूर, संजना कपूर ही मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती.