... तर आम्हीच पाकिस्तानात घुसू : अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

Dec 4 2017 6:20PM
वॉश्ंिगटन : पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांना संपविले नाही, तर आम्हीच पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्‌डे उद्धवस्त करू, असा इशारा अमेरिकेची सर्वोच्च गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख माइक पॉम्पियो यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि पेंटागन प्रमुख जेम्स मॅटिस सोमवारपासून पाकिस्तान दौऱ्यावर असतानाच हा इशारा देण्यात आला आहे.