मल्ल्या म्हणतो, मी निर्दोषच

Dec 4 2017 7:23PM
लंडन : मी काहीही केलेले नाही, मी निर्दोष असून माझ्याविरोधात कट रचण्यात आला असल्याचा कांगावा कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत असेही मल्ल्या याने म्हटले आहे. लंडन येथील वेस्टनिमिस्ट न्यायालयात मल्ल्या सुनावणीसाठी आला होता. त्यावेळी त्याने माध्यमांशी बोलताना निर्दोष असल्याचा आव आणला. भारतातील विविध बॅंकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून मल्ल्या लंडनमध्ये पळाला आहे. मल्ल्या याला लंडनमधून परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भातील सुनावणीस कालपासून सुरूवात झाली. याआधी, 20 नोव्हेंबर रोजी मल्ल्याने याने भारतात आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत लंडनच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. भाजप सरकारच्या कार्यकाळातच मल्ल्या देशाबाहेर फरार झाला. त्यामुळे कॉंग्रेससह विरोधी पक्ष मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहे.