परवेझ मुशर्रफ करणार हाफिज सईद हातमिळावणी

Dec 4 2017 7:34PM
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे हाफिज सईद याच्याशी राजकीय हातमिळावणी करण्यास उत्सूक आहेत. मुशर्रफ यांनी 2018 च्या निवडणुकीत लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याच सूत्रधार हाफिज सईदसोबत "युती करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हाफिज सईदसोबत निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी, आपण लष्कर ए तोयबाचे सर्वात मोठा समर्थक असल्याचे म्हटले होते.