भाजपचे लाड विजयी; विरोधकांची मते फुटली

Dec 7 2017 11:36PM
मुंबई, (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवून सहज विजय मिळवला. लाड यांना तब्बल 209, तर कॉंग्रेसच्या दिलीप माने यांना केवळ 73 मते मिळाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची तब्बल मते या निवडणुकीत फुटल्याने पुन्हा एकदा भाजपला अदृश्य हाताची मदत झाली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजप बरोबर गेलेल्या नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे प्रसाद लाड मोठ्या फरकाने निवडून आले.