कांदा 60 रुपये किलो!

Dec 7 2017 11:37PM
पुणे : मागील आठवड्यात बाजारात पुणे विभागातून कांद्याची विक्रमी आवक झाली होती. त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. मात्र, जुन्या कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत आवक घटली आहे. परिणामी घाऊक बाजारात कांद्याला 30 ते 40 रुपये दर मिळाला. तर किरकोळ बाजारातील दराने 60 रुपयांचा आकडा गाठला आहे. आवक वाढेपर्यंत दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी गुरुवारी वर्तविला आहे.