गुजरातमध्ये शेतकरी बेरोजगार : राहुल

Dec 7 2017 11:38PM
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमध्ये शेतकरी बेरोजगार झाला असून शेतकऱ्यांना सावत्र भावासारखी वागणूक का दिली जाते? असा सवाल गुजरात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी केला. त्यांनी मोदींना ट्विटरवरून काल नववा प्रश्न विचारला. न की कर्ज़ माफ़ी, न दिया फसल का सही दाम, मिली नहीं फसल बीमा राशि, न हुआ ट्यूबवेल का इंतजाम, खेती पर गब्बर सिंह की मार, छीनी जमीन, अन्नदाता को किया बेकार, साहब बतायें, खेडुत के साथ क्यों इतना सौतेला व्यवहार? असे ट्विट राहुल यांनी केले आहे.