इस्रायलची राजधानी जेरूसलेम; अमेरिकेची मान्यता

Dec 7 2017 11:39PM
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी वादग्रस्त शहर जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. बुधवारी रात्री त्यांनी ही घोषणा केली. तेल अवीव येथील अमेरिकी दूतावास जेरूसलेमला स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशदेखील ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत.