आधार जोडणीस मुदतवाढ

Dec 7 2017 11:41PM
नवी दिल्ली : कृषी कर्ज, सरकारी शिष्यवृत्ती, अनुदानित एलपीजी सिलिंडर यांसह विविध सरकारी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान आणि सेवा यांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला या सेवांना आधार जोडणी करण्यास केंद्र सरकारच्यावतीने मुदतवाढ करण्यात येणार आहे. मुदतवाढ 31 मार्च 2018 पर्यंत करण्यात येणार असून, याबाबत आज अधिसूचना जारी केली जाईल, अशी माहिती सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. यावेळी मोबाईल क्रमांकाला आधार जोडण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली नसून ती 6 फेब्रुवारीच असेल, असेही सरकारने स्पष्ट केले.