पंतप्रधानांवरील टीकेनंतर मणिशंकर कॉंग्रेसमधून निलंबित

Dec 7 2017 11:43PM
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका चांगलीच भोवली. पंतप्रधानांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल पक्षाने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. तसेच, त्यांना "कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली. तत्पूर्वी, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात फटकारल्यानंतर मणिशंकर यांनी माफी मागितली. मात्र, चहूबाजूने टीकेची झोड उठताच पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.